सलमान सोशल मीडियावर सर्वात लोकप्रिय दिग्गज

बॉलीवुडचा ’दबंग’ स्टार सलमान खान हिंदी चित्रपट जगातील महानायक अमिताभ बच्चन, `किंग खान’ शाहरूख, दक्षिण भारतीय चित्रपटातील सुपर स्टार कमल हसन सारख्या अभिनेत्यांना मागे टाकून सोशल मीडियावर सर्वात लोकप्रिय भारतीय अभिनेता बनला आहे. सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर नजर ठेवणारी चर्चित वेबसाइट `फेमकाउंट’ ने सोशल मीडियात भारतीय अभिनय जगातील सर्वात लोकप्रिय स्टारांची प्रसिद्ध सर्वकालिक यादीत `चुलबुल पांडे’ ला प्रथम स्थानावर ठेवण्यात आले आहे.

फेमकाउंटनुसार सलमान खानचे ३४,५४४,२०७ चाहते आहेत. दुसरीकडे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकवर सलमान खानचे ४,४२५,४४६ चाहते असून मायक्रो ब्लागिंग वेबसाइट ट्विटरवर त्याचे २३ लाखपेक्षा जास्त फालोवर आहेत. फेमकाउंटने सलमान खानबाबत लिहले, चित्रपट `बीवी हो तो ऐसी’ द्वारे आपल्या अभिनय कारकीर्दची सुरूवात करणार्‍या सलमानने आतापर्यंत ८० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे ज्यात `दबंग’, `हम आपके हैं कौन’ सारखे अनेक सुपर डुपर हिट चित्रपटांचा समावेश आहे.’

सोशल मीडियात सर्वात लोकप्रिय भारतीय दिग्गजांच्या या यादीत दुसर्‍या स्थानावर बॉलीवुडचा बेताज बादशाह शाहरुख खान आहे. फेमकाउंटनुसार सोशल मीडियात `किंग ऑफ बॉलीवुड’ चे ३४,१६८,४९३ चाहते आहेत. याप्रकारे शाहरुखचे फेसबुकवर ३,२२७,८५४ चाहते, ट्विटरवर २,५३१,२७१ फालोवर आहेत तसेच गूगल प्लसवर ७३७,३३० चाहते आहेत. बॉलीवुडचा `मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान या यादीत तिसर्‍या स्थानावर आहे.

फेमकाउंटनुसार आमिरचे ३१,५६३,२८७ चाहते आहेत. फेसबुकवर आमिरचे ५,४१४,४०७ चाहते आहेत तसेच ट्विटरवर २,४२०,१७४ फालोवर आहेत. या यादीत चौथ्या स्थानावर `पीसी’ अर्थात प्रियांका चोपडा आहे. फेमकाउंटनुसार सोशल मीडियात `देसी गर्ल’ चे २४,६३०,८१८ चाहते आहेत. इतकेच नव्हे तर फेसबुकवर प्रियंका चोपडाच्या पेजला ३,१४५,४५९ लोकांनी `लाइक’ केले असून ट्विटरवर तिचे १,८८७,७५४ फालोवर आहेत. व्हीडियो शेयरिंग वेबसाइट यूट्यूबवर माजी `मिस वर्ल्ड’ प्रियंकाच्या अकांउटला १,८८७,७५४ लोकांनी पाहिले. फेमकाउंटने या यादीत अभिनेता रितिक रोशनला पाचव्या, ’राउडी राठोड’ अक्षय कुमारला सहाव्या, रणवीर कपूरला सातव्या, दीपिका पादूकोणला आठव्या, बॉलीवुडचा ’शहेंशाह’ अमिताभ बच्चनला नववा, अभिनेता शाहिद कपूरला १०व्या स्थानावर ठेवले आहे. दक्षिण भारतीय चित्रपटातील सुपर स्टार कमल हसन या यादीत १८व्या स्थानावर आहे.

Leave a Comment