मध्यपूर्व तसेच संयुक्त अरब अमिरातीमधील अंधासाठीचे पहिले टेलर मशीन शारजा इस्लामिक बँकेने शारजा येथेच बसविले असून त्यामुळे अंध व दृष्टी विकलांगही बिनधोकपणे त्यांचे आर्थिक व्यवहार करू शकणार आहेत.

मध्यपूर्व तसेच संयुक्त अरब अमिरातीमधील अंधासाठीचे पहिले टेलर मशीन शारजा इस्लामिक बँकेने शारजा येथेच बसविले असून त्यामुळे अंध व दृष्टी विकलांगही बिनधोकपणे त्यांचे आर्थिक व्यवहार करू शकणार आहेत.
बँकेच्या या एटीएम मशीनमध्ये ब्रेल लिपीतील मोठे पॅड, स्क्रीन, हेडफोन व ग्राहकाची खात्री करून घेण्यासाठी स्पीकर अशा अनेक सुविधा उपलब्ध असून पॅडवरील किज किवा बटणे रूंद करण्यात आली आहेत. नेहमीच्या एटीएमपेक्षा यात थोडेच ऑप्शन खातेदाराला निवडावे लागणार आहेत. अंधांप्रमाणे अन्य नागरिकही हे एटीएम वापरू शकणार आहेत. एमिरेटस असोशिएशन फॉर ब्लाईंड मुख्यालयात बँक कर्मचारी अंध व्यक्तींना या संबंधीचे प्रशिक्षण देणार आहेत.
शारजाचे राज्यकर्ते शेख सुलतान बिन मोहमद अल कसीमी यांना अंध वकील मनर अल हमदी यांनी फोन करून अंधासाठी अशा मशीनची सुविधा करावी अशी मागणी केली होती. शेखांनी या पत्राची तातडीने दखल घेऊन बँकांना तसे आदेश दिले आणि त्यातूनच हे मशीन उपलब्ध करून दिले गेल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर तक्रारदार वकीलांना बँकेने त्यांचे खातेही बँकेत उघडून दिले आहे असे समजते.