मिस्ड कॉलला उत्तर दिल्यास नंबर हॅक होण्याची शक्यता

उत्तर प्रदेश, दि. ३ –  तुमच्या मोबाईल फोनवर +९२, # ९० किंवा # ०९ या क्रमांकाने सुरु होणारा कोणताही मिस्ड कॉल आला तर सतर्क व्हा. कारण या क्रमांकावर पुन्हा कॉल केल्याने तुमच्या सिम कार्ड आणि फोनची सर्व माहिती संबंधित मिस्ड कॉलच्या नंबरवर जाईल. म्हणजेच तुम्ही ज्यांना फोन केला आहे त्यांच्याजवळ तुमच्या सिमची क्लोनिंग तयार होईल.

ही क्लोनिंग फक्त सिम कार्डपुरतीच मर्यादित नाही, तर फोनमध्ये असणार्‍या मेमरी कार्ड आणि डाटा कार्डची माहितीही कॉपी होऊन जाईल. टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर आपल्या ग्राहकांना लवकरच या संदर्भात अलर्ट जारी करणार आहे.

एका अहवालाच्या माहितीनुसार, आतापर्यंत एक लाखांहून अधिक ग्राहक या प्रकरणाचे बळी पडले आहेत आणि या प्रकारे मिस्ड कॉलचा प्रकार अद्यापही सुरु आहे. गुप्तचर एजन्सीने आधीच सर्व्हिस प्रोव्हाडर्सना याबाबत सूचना दिली आहे. हे काम करणारं रॅकेट फक्त उत्तर प्रदेशाच्या वेस्ट टेलिकॉम डिव्हिजनमध्येच नाही, तर दिवसेंदिवस हे रॅकेट आपले जाळे जलद गतीने पसरवत आहे, असेही गुप्तचर एजन्सीने सांगितले.

या अंकांनी सुरु होणारे आणखी काही नंबर आहेत आणि हे नंबर मोबाईल फोनमध्ये असलेली प्रत्येक माहिती आपल्याकडे स्टोअर करत आहे, असे इंटेलिजन्सच्या अधिकार्‍याने सांगितले.

`आम्ही सर्व ब्रॉडबँड ग्राहकांना यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे आणि ग्राहकांना याबाबत मेसेजही पाठवण्यात येत आहेत,’  असे बीएसएनएलचे जीएम आर. व्ही. वर्मा यांना सांगितले. तर उत्तर प्रदेशच्या पोलिस अकॅडमीत शिकवणारे आयटी एक्सपर्ट रक्षित टंडन यांनी म्हणणे आहे की, कोणत्याही विचित्र प्रकारच्या क्रमांकाने येणारे कॉल न उचलणे हेच योग्य आहे.
आपल्या बँकेसंबंधित माहिती, डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती किंवा पासवर्ड मोबाईलमध्ये सेव्ह करु नका. कारण एखादा ग्राहक विचित्र नंबरच्या जाळ्यात अडकला तर सर्व माहिती संबंधित रॅकेटकडे जाईल आणि त्याचा ते गैरवापर करणार हे निश्चित, असे आयटी एक्सपर्ट पुनीत मिश्रा यांचे म्हणणे आहे.

एकदा ही सर्व माहिती संबंधित रॅकेटला मिळाली, तर त्या ग्राहकाच्या नंबरद्वारे धमकावणीचे फोनही केले जाऊ शकतात किंवा दहशतवादी हल्ल्यातही त्याचा वापर केला जाऊ शकतो.

टेलिकॉम सेक्टरमधल्या कंपन्यांना हा धोका कळला असला तरी त्याच्यावरचा उपाय सापडलेला नाही. आयटी एक्स्पर्टच्या सहकार्याने टेलिकॉम कंपन्या मिस्ड कॉल घोटाळा करणार्‍या हॅकर्सना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तोपर्यंत सर्व कंपन्यांनी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी +९२, # ९० अथवा # ०९ ने सुरू होणार्‍या एखाद्या अनोळखी नंबरवरुन आलेल्या मिस्ड कॉलला उत्तर देऊ नये, असे आवाहन केले आहे.

Leave a Comment