करीना आणि रणबीरची होणार टक्कर

सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटाशी तारखांचा संघर्ष होत असल्याने बर्फी या चित्रपटाची तारीख तीन वेळा बदलण्यात आली होती. मात्र नव्याने  ठरवण्यात आलेल्या फायनल तारखेमुळेही रणबीर कपूर आणि  करीना कपूरच्या चित्रपट तारखेत टक्कर होणार आहे.  या तारखेच्या घोळामुळे बहिण – भावातच आगामी काळात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रणबीर कपूरचा बहुप्रतीक्षित असलेला बर्फी हा चित्रपट १४ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. त्यानंतर आठवड्याने म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी करीना कपूरचा मेगाबजेट असलेला हीरोइन हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यादिवशी करीनाचा वाढदिवस आहे. तसे पाहता दोन्ही चित्रपट वेवेगळ्या धाटणीचे असल्याने त्यामध्ये कसलीच टक्कर नाही. मात्र काही ट्रेंड विश्लेषकच्या मते यामुळे दोन्ही चित्रपटाच्या बिजनेसवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सूत्राच्या मते कलाकार म्हणून रणबीर आणि करीना दोघेही एकमेकाची खूप कदर करतात. या चित्रपटाच्या टक्करीमुळे दोघाना तसा फारसा फरक पडणार नाही मात्र दोघेही एकमेकाचे चित्रपट पाठोपाठ येत असल्याने खूष नाहीत. दोघानाही आपल्या चित्रपटाविषयी आत्मविश्वास आहे. मात्र दोन्ही चित्रपटाना पुरेसा वाव मिळावा अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. यापूर्वी दोन्ही चित्रपटाच्या तारखा खूप वेळा बदलल्या आहेत. त्यामुळे आता तारखात बदल करणे म्हणजे चित्रपटावर याचा नकारात्मक परीणाम होण्याची शक्यता असल्याने आता ही रिस्क कोण घेणार हे सांगणे  कठीण झाले आहे.

Leave a Comment