एका चित्रपटात सात नायिका

एका चित्रपटात सात नायिका काम करणार हे ऐकूनच थोडसे अजब वाटत असेल; मात्र हे खरे आहे. दिग्दर्शक निखिल अडवानी लवकरच सात नायिकांना एकत्रित घेऊन एका नवीन चित्रपटची निर्मिती करीत आहेत. यासाठीच्या सात नायिका फायनल झाल्यानंतर या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.

दिग्दर्शक निखिल अडवानी यांनी सात पैकी दोन नायिका निश्चित केल्या आहेत. या   चित्रपटातून आघाडीची नायिका करीना कपूर व प्रियांका चोप्रा या दोघी झळकणार आहेत.  निखिल सध्या आणखीन पाच नायिकाचा शोध घेत आहेत. त्याशिवाय अभिनेत्री माधुरी दीक्षितकडे या चित्रपटात काम करण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे. तिने होकार दिला तर अमेरिकेतून परत आल्यानंतरचा तिचा हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे. 

त्याशिवाय राणी मुखर्जी, करिष्मा कपूर व शबाना आझमी यांना ही  या चित्रपटात काम करण्यासाठी ऑफर दिली असून त्यांनी होकार कळविला तर पाच नायिका फायनल होणार आहेत. वेगळ्या धाटणीच्या या चित्रपटात प्रथमच सात नायिका एकत्रित दिसणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट नायिका प्रधान असेल असे निखिल अडवाणीने सांगितले. त्यामुळे सर्वाना आतापासूनच या सात नायिका असलेल्या चित्रपटाविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

Leave a Comment