
मुंबई दि.२- गेले पाच महिने पगार न मिळाल्याने आणि त्यासंबंधी दिलेले आश्वासन न पाळल्याने किंगफिशरच्या पायलट्सनी पुन्हा संप पुकारला असून सोमवारी सकाळीच त्यांनी कामावर येण्यास नकार दिला. परिणामी मुंबईहून चेन्नई, मंगलोर, खजुराहोला जाणार्या चार फ्लाईटस रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. रविवारपासूनच किंगफिशरच्या कॅप्टनसह दोनशे पायलटसनी संप पुकारला आहे.
