सलमान लग्न कधी करणार?

तमाम बॉलिवूडकरांना सलमान कधी लग्न करणार हा प्रश्न पडला आहे. अगदी सलमानची एक्स-गर्लफ्रेण्ड कतरिनाने हेच सलमानला विचारले आहे. सलमान खान बॉलिवूडचा मोस्ट वॉण्टेड बॅचलर. या बॅचलरचे लग्न कधी होणार याचीच सगळे वाट पाहत आहेत.

कतरिनाला सलमान लग्न कधी करतोय याची उत्सुकता आहे.. यशराज बॅनरच्या ‘एक था टायगर’मध्ये कतरिनाने सलमानला हाच प्रश्न विचारला आहे. एवढंच नाही तर सलमानचा बेस्ट फ्रेण्ड आमीर खानदेखील सलमानच्या लग्नाची वाट पाहतो आहे. मिडीयासमोर आमीरने कित्येक वेळा जाहीरपणे हे सांगितले आहे.

सलमानच्या गर्लफ्रेण्ड खूप होत्या पण सलमानला लग्न कोणाशी करायचेय हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळे सलमानचे नाव सतत कोणाशी तरी जोडले जाते. एक अफवा अशीही आहे की सलमान आणि कतरिना यांच्यातच काहीतरी गुफ्तगू पुन्हा सुरू झाले आहे. म्हणजे कतरीनाला नक्की काळजी कोणती लागली आहे म्हणायचे?

Leave a Comment