यूनानमधील मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयावर हल्ला

अथेन्स दि.२९ – सॉफ्टवेयर क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टच्या यूनान मुख्यालयास लक्ष्य करत बुधवारी एक मोठा हल्ला घडवण्यात आला.

हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेली एक वॅन कार्यालयाच्याजवळ उडवून दिली. पोलिस सूत्रानुसार, भारतीय वेळेनुसार, सकाळी १२ वा.१५मि. शहरातील मारोसी भागातील मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात एक वॅनने  प्रवेश केला. हल्लेखोरांनी स्वयंचलित रायफल आणि पिस्तूलच्या मदतीने सुरक्षाकर्मचार्‍यांवर हल्ला केला आणि वॅनमध्ये स्फोट घडवून आणला. वॅनमध्ये गॅसोलिनचे पाच आणि गॅसचे तीन कंटेनर ठेवले होते. त्याला आग लागल्यामुळे चार मजली इमारतीचा खालचा भाग आगीने भस्मसात झाला. हल्ल्यात कसलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

पोलिसांनी याप्रकरणात कमीत कमी दोन हल्लेखोर सहभागी असल्याचे सांगितले. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी घेतली नाही. पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक या प्रकरणाची तपासणी करत आहे. हा हल्ला यूनानच्या अति वामपंथी बंडखोरांनी घडविल्याची शंका व्यक्त केली जात आहे. कारण यापूर्वीही असे हल्ले त्यांनी घडवून आणले आहेत.

Leave a Comment