
सध्या स्लिम ट्रीम दिसणारी समीरा रेड्डी एकेकाळी बरीच लठ्ठ होती. तिने स्वत:च हे गुपित सांगितले आहे. युटीव्ही स्टार्सच्या `द चोजन वन’ या कार्यक्रमात अँड गुरू प्रल्हाद कक्कर यांच्यासोबत समीरा सहभागी झाली होती. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तिने दिलेल्या एका टास्कनंतर एक स्पर्धक रागावली आणि रडायला लागली, तेव्हा तिला समजावताना समीराने हे गुपित उघड केले.
