नवी दिल्ली, दि. २ – नंदन नीलकनीचे नेतृत्व असणार्या उईदाईसह वाद झाल्यानंतर रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने ६६.६८ कोटी लोकांची डेटा इंट्री पूर्ण केली आहे. राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर तयार करण्यासाठी त्याने तीन कोटीपेक्षा जास्त लोकांचे बायोमॅट्रिक डाटा देखील एकत्र केली आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की, राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरसाठी बायोमेट्रिक डाटा एकत्र करणे सुरू आहे. एक महिनापूर्वी गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एक पत्र लिहून तक्रार केली होती की, आधार नम्बर जनरेट करण्यासाठी एनपीआर डाटाचा उपयोग करण्यासाठी उईदाईने नकार दिल्यामुळे एनपीआर प्रोजेक्ट ठप्प पडलेले आहे. गृहमंत्र्यांच्या विरोधानंतर सरकारने प्रत्येक नागरिकाला विशिष्ट ओळख नंबर देण्यासाठी उईदाईला गृह मंत्रालयात येणारे रजिस्ट्रार जनरलद्वारे जमा केलेल्या बायोमेट्रिक माहितीचा उपयोग करण्याचा निर्देश दिला. उईदाई योजना आयोगाअंतर्गत येते.
रजिस्ट्रार जनरलद्वारे ६७ कोटी लोकांची माहिती एकत्र
भारताचे पोलाद मंत्री बेनी प्रसाद वर्मा यांनी सांगितले की, एनआरआय अब्जोपती लक्ष्मी मित्तल यांनी भारत व भारतीय सरकारला बदनाम करणे बंद करायला हवे. जगातील सर्वात मोठी पोलाद कंपनी आर्सेलोर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांनी मागच्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये भारतात सुधारणेत आलेल्या गतिरोधाची निंदा केली होती. `औद्योगीकरण प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेच्या विकासातील महत्तवपूर्ण घटक असून विकासाला धोक्यात टाकून भारत शक्यतो कोट्यावधी लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त वेळेपर्यंत गरीबीत राहण्यासाठी बाध्य करत आहे.’ झारखंड व ओडीशामध्ये जमीनच्या अधिग्रहणाशी संबंधित समस्याबाबात पोलाद मंत्र्यांनी सांगितले की, हा प्रांताचा वाद आहे. त्यांनी तक्रार केली की, मित्तल यांनी त्यांना कधी संपर्क केला नाही. बेनी प्रसाद वर्मा यांनी दक्षिण कोरियाच्या पोस्को कंपनीचा हवाला देऊन सांगितले, `जे पुढे जाऊ इच्छितात ते पोस्कोप्रमाणे प्रगती करत आहेत.’ झारखंड व ओडीसामध्ये ३० अब्ज डॉलरचे प्रकल्प लागु करण्यासाठी आर्सेलर मित्तल सहा वर्षापासून प्रतिक्षा करत आहे. मित्तल यांनी मे मध्ये म्हटले होते, `आम्ही भारतात अडचणींचा सामना करत आहोत. माझे मत आहे की, भारतीय प्रकल्प आगामी पाच ते दहा वर्षापूर्वी सुरू होणार नाहीत.’
