’माफीसाठी सरबजित बनला मुस्लिम’

इस्लामाबाद,-पाकिस्तानी तुरुंगात शिक्षा भोगून भारतात परतलेल्या सूरजित सिंग यांच्या नावावरुन पाकिस्तानी प्रसार माध्यमे सरबजितवर हल्लाबोल करीत आहेत. सरबजितने इस्लाम धर्म स्विकारला असून ’सरफराज’ असे नवे नाव धारण केले आहे, असा नवा दावा करण्यात आला आहे.

सूरजित यांचा हवाला देऊन पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये सरबजितबाबत वेगवेगळी विधाने प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यात आता सरबजितच्या धर्म परिवर्तनाच्या बातमीने भर टाकली आहे. ’पाकिस्तान टुडे’ने ही बातमी देऊन म्हटले आहे की, सरबजितने इस्लाम धर्म स्विकारला आहे. ’सरफराज’ असे त्याचे नवे नाव आहे. त्याच्याशिवाय आणखी एक कैदी किरपाल सिंग यानेही इस्लाम स्विकारला असून ’मोहम्मद दिन’ असे त्याचे नवे नाव आहे.

फाशीची शिक्षा माफ व्हावी, यासाठी त्यांनी इस्लाम स्विकारला असावा, असे सूरजित सिंग यांनी म्हटल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. एवढे करुनही त्यांना माफी देण्यात आलेली नाही. पाकिस्तानी सरकारचे अधिकारी स्वतःच्याच देशातील नागरिकांबद्दल कठोर असतात.

Leave a Comment