बलात्कार करून तीन वर्षीय चिमुरडीची निघृर्ण हत्या

इंदूर,२६जून-तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची निघृर्ण हत्या केल्याची घटना येथील मालवीय नगरात घडली. शिवानी फणसे असे या चिमुरडीचे नाव आहे. मालवीय नगरातील एका नाल्यात सोमवारी शिवानीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ मागली होती. लग्नाची वरात पाहण्यासाठी गेलेली शिवानी रविवारपासून बेपत्ता होती.

आरोपींना फासावर लटकवाः
तीन वर्षीय शिवाणी फणसेच्या मारेकर्‍यास तत्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्या; अशी मागणी शिवानीच्या नातेवाईकांनी केली आहे. एमआयजी पोलिस ठाण्यात शिवानीचा मृतदेह ठेऊन तिच्या नातेवाईकांनी निदर्शने केली. पोलिसांनी आरोपीला पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी शिवानीवर अंत्यसंस्कार केले.
शिवानीचा आई- वडिल हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात. ते मंदसौर जिल्ह्यातील ननासा गावातील रहिवासी आहे.

Leave a Comment