पहिल्या विजयाने शारापोवा आनंदी

लंडन,दि.२६ – जगातील अग्रमानांकीत रशियन महिला टेनिसपटू मारिया शारापोवा वर्षातील तिसर्‍या ग्रँड स्लॅम विम्बल्डनच्या पहिल्या फेरीतील विजयाने खुपच खूश आहे. नुकेतच फ्रेंच ओपनचे एकेरी जेतेपद पटकाणार्‍या शारापोवाने सोमवारी खेळलेल्या महिला एकेरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अनास्तासिया रोडियोनोवा ला सरळ सेटमध्ये ६-२, ६-३ ने पराभूत केले. शारापोवाने हा सामना ७० मिनिटात आपल्या नावावर केला.

विजयानंतर शारापोवा म्हणाली की, ज्याप्रकारे मी आजच्या सामन्यात कामगिरी केली, त्यामुळे मी अत्यंत खूश आहे. विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर खेळणे  नेहमीच आनंददायक असते.  वर्षातून एकदा ही संधी मिळते. हे माझ्यासाठी विशेष आहे.

२००४ साली १७ व्यावर्षी शारापोवाने पहिल्यांदा या प्रतिष्ठित स्पर्धेवर ताबा मिळवला होता. दुसर्‍या फेरीत शारापोवाचा सामना २०१० सालची  सेमीफायनलिस्ट स्वेताना पिरोनकोवाशी होईल. शारापोवा म्हणाली, मला विश्वास आहे की, मी अजूनही खूप काही प्राप्त करु शकते. आपल्याला किती यश मिळाले आणि किती अपयश मिळाले यापेक्षा  मला पूर्णतः विश्वास आहे की, मी चांगली कामगिरी करु शकते.