आयसीसीच्या अध्यक्षपदी न्यूझीलंडचे अॅलन आयसॅक

क्वालालंपूर दि.२८ – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष शरद पवार यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून पवारांच्या जागी न्युझीलंडचे अॅलन आयसॅक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयसीसीच्या आज झालेल्या बैठकीत आयसॅक यांच्या नियुक्ती ची औपचारीक घोषणा करण्यात आली. शरद पवार यांनी आपल्या कारकीर्दिची दोन वर्षे समर्थपणे पूर्ण केली. शरद पवार अध्यक्ष असतानाच भारताने विश्वचषक जिंकला होता.

६० वर्षीय अॅलन आयसॅक हे आयसीसीचे आठवे अध्यक्ष बनले आहेत. यापूर्वी त्यांनी न्युझीलंड क्रिकेट मंडळाचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते. आयसॅक हे २०१४ पर्यंत आसीसीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

Leave a Comment