
आमीर सध्या छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या अनेक चॅट शो पैकी सर्वाधिक टॉपचा अँकर ठरला असला तरी आमीर दिलेल्या वचनाला पक्का आहे. याचा अनुभव नुकताच आला. `सत्यमेव जयते’ या त्याच्या शोमध्ये घरगुती हिंसाचार विषयावरील जो कार्यक्रम झाला. त्यात सहभागी झालेल्या शानो या टॅक्सीचालक महिलेला त्याने वचन दिले होते. ते असे की जेव्हा कधी तो दिल्लीत येईल तेव्हा शानोच्याच टॅक्सीतून प्रवास करेल. विशेष म्हणजे आमीर नुकताच दिल्लीला गेला होता आणि त्याने आठवणीने शानोचीच टॅक्सी मागवून त्यातून प्रवास केला.
