उत्तर प्रदेशात अनेक समांतर मुख्यमंत्री : बसपा

उत्तर प्रदेश विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष बहुजन समाज पार्टीने राज्यात अनेक ’समानान्तर मुख्यमंत्री’ असल्याचा आरोप करीत आज म्हटले की, अखिलेश यादव सरकार याच कारणामुळे आपल्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यकाळात प्रत्येक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.

बसपा प्रदेश अध्यक्ष स्वामी प्रसाद मौर्य यांनी पत्रकारांना येथे सांगितले की, राज्यात एकच मुख्यमंत्री असता तर समस्या अटोक्यात राहून घोषणांची अमलबजावणी करता आली असती. मात्र ही स्थिती अनेक समांतर मुख्यमंत्र्यामुळे आहे. कोणी सुपर सीएम आहे, तर कोणी सीएम आहे, कोणी सीएम इन वेटिंग’ आहे.सरकारमध्ये सत्तेची अनेक केंद्र असल्याने ते लोकहिताच्या विविध मुद्द्यांवर अनिर्णय आणि गोंधळाच्या स्थितीत आहे. परिणामी हे सरकार आपल्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यकाळात प्रत्येक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.

मौर्य म्हणाले, सपा प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी आपले मुख्यमंत्री पुत्र अखिलेश यादव यांच्या सरकारला त्यांच्या कार्यकाळाला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त १०० पैकी १०० गुण दिले आहेत. मात्र त्यांनी एकही काम केले नाही, हे सत्य आहे. सपा सरकार आपल स्थापनेच्या १०० दिवसानंतरही आपले बजेट पारित करू शकले नाही.त्यामुळे नवीन विकास कामांची सुरूवात होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. विकासाच्या बाबतीत सपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून १०० दिवसांचा हा प्रवास शून्याकडून शून्याकडे असाच राहिला.

सपा सरकार आधीच्या बसपा सरकारच्या कायांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप मौर्य यांनी केला.

Leave a Comment