`मनमोहन सिंग यांनीच अर्थ मंत्रालय संभाळावे’

नवी दिल्ली, दि. २४ –  अर्थमंत्री प्रणव मुखर्जी रायसीना हिल्स जाण्याच्या स्थितीत आगामी अर्थमंत्री कोण राहील यावर चर्चा सुरू आहे. परंतु दरम्यान अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसुनुसार अर्थ मंत्रालय जर पंतप्रधानांकडे राहिले, तर हे देशासाठी खुप चांगले राहील. पंतप्रधान मनमोहन सिंग कुशल अर्थशास्त्री असून १९९१ मध्ये त्यांनी आर्थिक सुधारणांना गती दिली होती. त्यांनी मल्टीब्रांड सेक्टरमध्ये सरकारच्या एफडीआय प्रस्तावचा देखील आधार घेतला.

आगामी अर्थमंत्री कोण राहील हे सांगणे सध्या शक्य नाही कारण याचा निर्णय राजकीय पातळीवर होतो. त्यांनी मानले की, जो कोणता व्यक्ती या पदावर आसीन होईल तो पूर्णपणे यास पात्र असायला हवा. त्यांनी असेही मानले की, आघाडी राजकाराणाने सरकारची निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होते.

बदलती व खराब होणार्‍या भारतीय अर्थव्यवस्थेवर विचारलेल्या एक प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, मागच्या तिमाहीत आर्थिक विकास दरवाढ ५.३ टक्केवर आला होता. घरगुती पातळीवर देखील समस्या आहे. परंतु याचाही स्वीकार करायला हवा की, ग्लोबल परिस्थितीमुळे समस्या निर्माण होत आहे. सरकारकडे संधी आहे की, त्याने इतर घटक पक्षासोबत मिळून सुधारणेला पुढे वाढवावे.

दरम्यान, त्यांनी प्रशासनिक सुधारणावरही चर्चा केली. त्यांनी नोकरशाहीने हे मानायला पाहिजे की, ते राष्ट्रहितात आपले काम करत आहे. त्यांनी म्हटले की, आघाडी सरकारमध्ये सर्वसंमतीने निर्णय घेतले जातात. यात काही मतभेद असू शकतात.

Leave a Comment