`हिम्मतवाला’च्या रिमेक मध्ये दिसणार अजय देवगण

बॉलीवूड मध्ये जुन्या हिन्दी चित्रपटाचे रिमेक तयार करण्याची स्पर्धा लागलेली दिसत आहे. येत्या काळात अनेक चित्रपटाचे रिमेक पाहण्याची संधी आता प्रेक्षकांना यामुळे मिळणार आहे. १९८३ साली प्रदर्शित झालेल्या जितेंद्रच्या `हिम्मतवाला’ या चित्रपटाचा रिमेक तयार करण्याचा निर्णय चित्रपट दिग्दर्शक साजीद खान याने घेतला असून, या चित्रपटाचा नायक म्हणून अभिनेता अजय देवगण काम करणार आहे. `बोल बच्चन’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर तो या चित्रपटाच्या चित्रिकारणासाठी वेळ देणार असल्याचे समजते.

हा चित्रपट जरी `हिम्मतवाला’ या चित्रपटाचा रिमेक असला तरी या चित्रपटाचे कथानक व माझी भूमिका पूर्णपणे वेगळी असल्याचे अजय देवगणने सांगितले. या चित्रपटतील जितेंद्रजिची भूमिका मला खूप आवडली होती. त्यामुळे मी हा चित्रपट किती तरी वेळा पहिला आहे. मी त्याकाळी त्यांचा चाहाता होतो. साजिदने या चित्रपटाची निर्मिती पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने केली आहे. करमणूकप्रधान हा चित्रपट असणार आहे. त्यामुळे या चित्रपटात काम करण्याची माझी उत्सुकता वाढत असल्याचे अजयने सांगितले.

`हिम्मतवाला’  या चित्रपटावर आधारित हा चित्रपट असला तरी स्क्रिप्ट पूर्णपणे वेगळे असल्याचे दिग्दर्शक साजिद खान याने सांगितले. जितेंद्रप्रमाणे या चित्रपटात अजय डान्स करणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकाच्या पसंतीला उतरले, असा विश्वास खान याने यावेळी बोलताना व्यक्त केला.