
लॉस काबोस, दि. २० – पंतप्रधान मनमोहन सिंग आज म्हणाले की, सरकार सब्सिडी, राजकोषीय तोट्यावर अंकुश लावण्यासहित `कठोर’ निर्णय घेण्यासाठी प्रतिबद्ध आहे. त्यांनी पुन्हा आठ ते नऊ टक्के वार्षिक दरवाढ प्राप्त करण्याची अपेक्षा वर्तवली. देशाच्या आर्थिक वाढीत येणार्या घसरणीवर चिंता वर्तवून सिंग म्हणाले की, जनता उच्च दरवाढात पुनरागमन व रोजगारविषयी संधीत तीव्र विस्तार करण्यासाठी `अधीर’ होत आहे. गुंतवणुकदारांचा विश्वास बहाल करण्यासाठी पाऊल उचलल्या जात आहे. विकसित व विकासनशील देशाच्या संघटना समूह जी-२० च्या सातव्या शिखर संमेलनाच्या पूर्ण सत्राला संबोधित करून पंतप्रधानांनी भारताच्या आर्थिक नरमीशी संबंधित काही मुद्यांचा उल्लेख केला. जगातील मुख्य नेत्यांना संबोधित करताना सिंग म्हणाले, `दुसर्या देशाप्रमाणे आम्ही लोकांनी २००८ नंतर प्रोत्साहनासाठी राजकोषीय तोटा वाढु दिला. आता आम्ही लोक याच्या विस्ताराला उलट दिशेत वळवण्यावर आपले लक्ष केंद्रित करीत आहोत. यासाठी सब्सिडीया अंकुश लावण्यासहित कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि आम्ही यासाठी प्रतिबद्ध आहोत.’