सायना नेहवालला इंडोनेशिया ओपन सीरिजचे अजिंक्यपद

नवी दिल्ली, १८ जून – सायना नेहवालने चीनच्या जुएरूई ली ला २१-१३, २०-२२,१९-२१ ने पराभूत करत इंडोनेशिया ओपन सुपर सीरिजचे अजिंक्यपद पटकावले आहे.

सायनाचे इंडोनेशिया ओपनचे तिसरं विजेतेपद ठरले. या आधी सायनाने २००९ आणि २०१० मध्ये विजेतेपद पटकावले होते. २०११ मध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र, यावेळेस ती आपल्या शानदार खेळाने इंडोनेशिया ओपनची चॅम्पियन ठरली. दरम्यान, २०१२ सीझनमधील सायनाचे हे तिसरं अजिंक्यपद ठरले.

सायना नेहवालने इंडोनेशिया ओपनच्या फायनलमध्ये धडक मारल्याने अपेक्षा उंचावल्या होत्या. सायनाने कोरियाच्या सुंग जी ह्युंगचा २२-२०, २१-१८ ने धुव्वा उडवला. सायनाच्या धडाक्यापुढे सुंगचे काहीच चालले नाही. पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतल्यावर सुंगने जोरदार कमबॅक केला. मात्र, शेवटी सायनाच्या अनुभवामोर सुंगला नतमस्तक व्हायला लागला. दोन लीग मॅचेसमध्ये आणि क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये भारताच्या या शटलर क्वीनला विजयासाठी चांगलचे झगडावे लागले. मात्र, सेमी फायनलची मॅच तिने आरामात जिंकली.