सनथ जयसूर्या दिसला श्रीलंकन अभिनेत्री सोबत

गेल्या काही दिवसापासून श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज मुंबईमध्ये झलक दिखलाजा या डान्स शोसाठी आला आहे. सध्या या शोच्या चित्रीकरणच्या कामात तो व्यस्त असला तरी अधून मधून मुंबईमध्ये फेरफटका माऱ्याला विसरत नाही. परवाच तो श्रीलंकन प्रसिद्ध अभिनीत्री चंडी परेरा हिच्या सोबत डिनर घेत असल्याचे दिसून आला. त्यमुळे आता सर्वत्र वेगळीच चर्चा ऐकावयास मिळत आहे.

मुंबई येथील प्रसिद्ध हॉटेल नोवेटेलमध्ये सनथ व चंडी दोघेजण एकत्रित दिसून आले. जेवण केल्यानंतर ही काही काळ दोघेजण एकत्र फिरत असल्याचे काही जणांनी पहिले आहे. या वेळी सनथ बराच शांत दिसत होता. क्रिकेट मधून सेवानिवत झाल्यापासून तो वेगळ्या पद्धतीने जीवनाचा खरा आनंद आता घेत आहे.

झलक दिखला जा या शो च्या चित्रीकरणातून डान्स करून थकाल्यानतर तो मुंबईचा फेरफटका मारण्यासाठी वेळ काढतो. याच दरम्यान तो चांडीला भेटत असल्याने काहीजन त्याचा वेगळा अर्थ काढत आहेत. तसे असले तरी सनथ हा खूप शांत स्वभावाचा असल्याने त्याने दोघातील संबंध मैत्रीपूर्ण असलयाचे सांगून टाकले आहे. तर चंडीने दोघाची भेट ही तशी याठिकाणी सहजपणे झाली असून मी एका श्रीलंकन चित्रपटाच्या चित्रीकरणसाठी आले असल्याचे तिने सांगितले.

Leave a Comment