लंडन ऑलिम्पिकसाठी फेसबुकवर नवे पोर्टल

लंडन, दि. १९ –  लंडन ऑलिम्पिकसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्यासाठी सर्वांचीच जोरदार तयारी सुरु आहे. त्यात फेसबुकही मागे नाही, कारण फेसबुकने लंडन ऑलिम्पिकसाठी एक पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलद्वारे फॅन्स आपल्या आवडत्या ऑलिम्पियनसोबत कनेक्टेड राहू शकतात.

ऍथलीट आणि खेळासोबतच या स्पर्धेचा १८०० पासूनचा संपूर्ण इतिहास या पोर्टलवर दिसणार आहे. या पोर्टलद्वारे सोशल मीडिया स्टेडियम निर्माण होईल असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे म्हणणे आहे.

ऍथलीट काय पोस्ट करु शकतो आणि काय नाही, यावर निर्बंध घालण्याते आहे. त्यामुळे काही मजकूर प्रसिद्ध करता येणार नाही.

या पोर्टलवर ब्रँड आणि ब्रॉडकास्टिंग संदर्भातील मजकूर फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट करण्यावर स्पर्धकांना कडक मार्गदर्शकतत्त्वे घालण्यात आली आहेत.

ऑलिम्पिक स्थळातून कोणताही व्हिडीओ या पोर्टलवर पोस्ट करणे प्रतिबंध करण्यात आले आहे.