आकाशद्वारे आता ई-शिक्षणाची तयारी

नवी दिल्ली,  दि. १८ – सरकारने स्वस्त टॅबलेट आकाशाच्या माध्यमातून शिक्षण देण्याची तयारी सुरु केली आहे. या उद्देशासाठी विविध क्षेत्रातील भाषांची सामग्री तयार करण्याचे कार्य सुरु केले जात आहे. जे माहिती प्रसार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रदान केले जाईल. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका अधिकार्‍यानुसार ई-शिक्षा प्रदान करण्यासाठी आकाशचे महत्वपूर्ण योगदान असेल. विविध विषयांवर क्षेत्रीय भाषेत ई-सामग्री तयार केली जाईल. आकाशला आयसीटीच्या माध्यमातून सर्व विद्यापीठ तसेच शैक्षणिक संस्थेशी जोडले जाईल आणि हे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल.

अधिकार्‍याने सांगितले की, आयआयटी, आयआयएसइसी सारख्या संस्था इंजीनियरिंग आणि विज्ञान विषयात ई-सामग्री तयार करत आहेत. याबरोबरच सामाजिक विज्ञान, कला, वाणिज्य, मानविकी सारख्या विषयातही ई सामग्री तयार केली जात आहे. आता वेळे आली आहे की, या विषयात ई-सामग्रीला क्षेत्रीय भाषेतही तयार केले जाईल. या उद्देशासाठी क्षेत्रीय भाषांचे जानकार तसेच त्या विषयाच्या तज्ज्ञांकडून प्रस्ताव मागवले आहेत.

मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी नुकतेच सांगितले होते की, उच्च शिक्षणाचा उद्देश्य पूर्ण करण्यासाठी २२ कोटी रुपये खर्चण्याची गरज आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, आकाश मोठ्या संख्येने निर्माण करण्यासाठी नवीन निविदा जारी करण्यात आलेली नाही, परंतु यास उन्नत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, जेणेकरुन माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या प्रसारचा उद्देश प्राप्त केला जाईल.

अधिकार्‍याने सांगितले की, आकाश निर्मितीच्या संदर्भात मनुष्यबळ विकास मंत्रालयसोबत दूरसंचार मंत्रालय, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयसह काही सार्वजनिक कंपन्या, आयआयटी राजस्थान, आयआयटी मुंबई, आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरशिवाय सीडेक एकसोबत मिळून काम करत आहेत. योजनेशी संबंधीत एका महिलेचे म्हणणे आहे की, काही कंपन्यांची इच्छा आहे की, ही योजना बंद व्हावी, जेणेकरुन त्यांचा धंदा व्यवस्थित सुरु राहील, काही कंपन्या यास ४४ हजार कोटी रुपये व्यवसायाच्या रुपात पाहात आहेत.

एका असाही वर्ग आहे, ज्यांची इच्छा आहे, आकाशची कमीत कमी २,२७६ रूपये असावी आणि वेळेनुसार त्यात बदलही करता यायला हवेत. मनुष्यबळ विकासमंत्री सिब्बल यांचे म्हणणे आहे की, प्रारंभी परीक्षणासाठी एक लाख `आकाश’ बनविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु यामुळे हा उद्देश पूर्ण होणार नाही.

आकाशसमोर गुणवत्ता आणि सुविधा बनविण्याचे मोठे आव्हान आहे. तथापि, चांगल्या सुविधा असणारा `आकाश २’ तयार झाला आहे. बाजारातील उपलब्ध टॅबलेटमध्ये आकाशचे खूप स्वस्त असणे शिक्षणाच्या प्रसारासाठी महत्त्वाचे आहे.