राष्ट्रपतीपद निवडणूक : एनडीएच्या बैठकीत निर्णय नाही

नवी दिल्ली, दि. १८  – राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्षांच्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भारतीय जतना पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निवसस्थानी एनडीएतील घटक पक्षांची रविवारी बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीस एनडीएतील घटक पक्षासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज आदी नेते उपस्थित आहेत. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीनंतर एनडीए आपला उमेदवार जाहीर करेल असे वाटत होते. मात्र बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली.

या बैठकीस शिवसेना गैरहजर राहिली. राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात शिवसेनेने अद्याप आपली भूमीका जाहीर केली नाही. यासंदर्भातील निर्णय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे घेतील, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. गेल्यावेळी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीएच्या उमेदवारास पाठिंबा देण्याऐवजी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे यावेळी शिवसेना कोणती भूमीका घेत याकडे सर्वांचे लक्ष आहे.

भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललीता यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान अडवाणी यांनी संगमा यांच्या नावाला पाठिंबा देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे ममतांनी राष्ट्रपतीपदासाठी एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाला पाठिंबा दिला व एनडीएच्या उमेदवारास पाठिंबा देण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीए पी.ए.संगमा यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment