मुंबईतील संगणक कंपनीला मायक्रोसॉफ्टचा दणका

नवी दिल्ली दि.१८- मुंबईतील गिझ्गा हर्टस या संगणक विक्री करणार्‍या कंपनीला मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सॉफ्टवेअर्सचा बेकायदा वापर केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने दोन लाख रूपये दंड ठोठावला असून या कंपनीविरूद्ध बौद्धिक संपदा हक्काचे तसेच कॉपी राईटस कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा मान्य केला आहे.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार मायक्रोसॉफट कंपनीने गिझ्गा हर्टस या कंपनीविरूद्ध तसेच कंपनीचे मालक निमेश याच्याविरूद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीची विंडोज सेव्हन सारखी अनेक सॉफ्टवेअर बेकायदा संगणकात वापरून ते संगणक विक्री केल्याविरोधात दिल्ली उच्चन्यायालयात दावा दाखल केला होता. निमेश त्याच्या ग्राहकांनी मायक्रोसॉफट विंडोज व्हिस्टा, मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००७ व तत्सम सॉफ्टवेअर्स विना परवानाच लोड करून देत असे .जुलै २०१० मध्ये पायरसीसंबंधीची माहिती कंपनीला मिळाल्यानंतर हा दावा दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश मनमोहनसिंग यांनी सर्व आरोपांची खातरजमा केल्यानंतर गिझ्गा हर्टस आणि त्याचा मालक नितेश यांच्यावर करण्यात आलेले आरोप ग्राह्य धरून कंपनीला दोन लाख रूपयांचा दंड ठोठावला तसेच या कंपनीवर बंदीही घालण्याचे आदेश दिले असे समजते.

Leave a Comment