राणा चित्रपटातून दीपिका बाहेर

गेल्या काही दिवसापासून काही न काही कारण सांगून अभिनेत्री दीपिका पदुकोण चित्रपट सोडत आहे. तिने काही दिवसापूर्विंच रमेश तोराणीचा रेस २ हा चित्रपट सोडला होता. त्यासाठी त्यांनी दीपिकाची किती तरी मनधरणी केली होती मात्र शेवटपर्यंत ती तिच्या निर्णयावर ठाम राहिल्याने दोघाजनाचे मोठे नुकसान झाले. त्या पाठोपाठ आता रजनीकांत सोबतच्या राणा या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय दीपिकाने घेतला आहे. मात्र हा निर्णय दीपिकाने व्यस्त असल्याच्या कारणाने नव्हे तर चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला असल्याचे समजते.

यापूर्वीच तिचा रजनीकांत सोबतचा कोचेदेया हा चित्रपट नोवेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्या पाठोपाठ रजनीकांत सोबतच्या दुसऱ्या चित्रपट प्रेषक स्वीकारतील काय या भीतीने तिने हा चित्रपट सोडल्याची चर्चा ऐकावयास मिळत असली तरी खरे कारण मात्र वेगळेच आहे. राणा चित्रपटाचे चित्रीकरण खूप दिवसापूर्वीच सुरु होणार होते मात्र रजनीकांतची तब्येत ठीक नसल्याने बराच काळापासून हा चित्रपट रखडला आहे. कोचेदेया या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांतची मुलगी सोंदर्य हिने केले आहे.  त्यामुळे रजनीकांतने कोचेदेया या चित्रपटाला प्राधन्य दिले. कोचेदेया हा चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. राणा चित्रपटातून दीपिकाला वगळण्याचे कारण निर्माता एस रविकुमार यांना विचारला असता ते म्हणाले की, कोचेदेया या चित्रपटामुळे रजनीकांत- दीपिका या जोडीला प्रेषक पुन्हा लगेचच स्वीकारणार नसल्याने तिला वगळण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचे त्यानी स्पष्ट केले.