आज दहावीचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने  फेब्रुवारी-मार्च २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या इयत्ता  दहावीचा निकाल उद्या (दि.१३) दुपारी १ वाजता  मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिर केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांनी व पालकांनी  http://mahresult.nic.in,   www.msbshse.ac.in, www.sscresult.mkcl.org, www.exmetc.com, या  संकेतस्थळावर जाहिर  करण्यात आलेला निकाल पहावा. विद्यार्थ्यांना मोबाईलच्या माध्यमातूनही निकाल पाहता येणार आहे. बीएसएनएल मोबाईल धारकांनी MSSC<seat no टाईप करून या ५७७६६ क्रमांकावर एसएमएस पाठवावा तर एअरटेल मोबाईल धारकांनी वरील एसएमएस ५५०७७ या क्रमांकावर पाठवावा.

निकालासंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी पुणे विभागीय मंडळातर्फे हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून निकालाविषयीच्या प्रश्‍नांबाबत  (०२०)  २५५३६७१२ , २५५३६७८३ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.विद्यार्थ्यांना गुणपत्रकाची मुळ प्रत येत्या २२ जून रोजी दिली जाणार आहे. असे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.