
गुंतवणूक मानांकन देणार्या स्टँडर्ड अॅन्ड पूअर्स संस्थेने भारतातील आर्थिक सुधारणांचा वेग असाच राहिला आणि आर्थिक सुधारणांतील राजकीय हस्तक्षेप थांबला नाही तर भारताचे गुंतवणूक मानांकन जाऊ शकते असा इशारा दिला आहे. असे घडले तर ब्रिक देशातील गुंतवणूक मानांकनातून बाहेर पडणारा भारत हा पहिला देश असेल. ब्रिक देशात भारत, चीन, ब्राझील आणि रशिया या देशांचा समावेश आहे.
