बेस्टने मोडला झहीरचा विक्रम

विंडीजचा वेगवान गोलंदाज टीन बेस्टने भारताचा जलदगती गोलंदाज झहीर खानचा सात वर्षापूर्वीचा विक्रम मोडला. त्याने इंग्लंड विरुद्च्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ११ व्या क्रमांकवर फलंदाजी करताना ९५ धावा केल्या.

सुमारे सात वर्षापूर्वी  भारताचा जलदगती गोलंदाज झहीर खानने २००४ साली बांगलादेश विरुद्ध खेळतांना ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला येवून  ७५ धावा केल्या होत्या. त्याचा हा विक्रम विंडीजचा वेगवान गोलंदाज टीन बेस्टने १५ वा कसोटी सामना खेळताना मोडला.  या सामन्यात यष्टीरक्षक रामदिनने नाबाद १०५ धावा केल्या. त्याच्या सोबत १४७ धावाची भागीदारी करताना बेस्टने विंडिजला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवले आहे. त्याने केवळ ११२ चेंडूत १४ चौकार व एक षटकार खेचून ९५ धावा केल्या. ही कामगिरी करीत असताना त्याने ११ व्या क्रमांकवर फलंदाजी करताना विंडिजकडून यापूर्वी वेसले हालने १९६२ साली भारता विरुद्च्या सामन्यात ५० धावा केल्या होत्या, तो विक्रमही मोडला. त्यासोबतच ११ व्या क्रमांकवर फलंदाजी करताना आतापर्यंत १३ पेक्षा अधिक अर्धशतकाच्या भागीदारी झाल्या आहेत.

Leave a Comment