बाबा रामदेव – चंद्राबाबू नायडू यांची भेट

हैदराबाद, दि. ११ – योगगुरू बाबा रामदेव यांनी सोमवारी सकाळी येथे तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला विविध पक्षांच्या नेत्यांचा पाठींबा मिळावा, यासाठी बाबा रामदेव राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेत असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली आहे. चंद्राबाबू नायडू आणि बाबा रामदेव यांची अलीकडील काही महिन्यांतील ही दुसरी भेट आहे. बाबा रामदेव आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरूद्ध जे आंदोलन पुकारले आहे, त्यास पाठींबा देण्याचा निर्धार यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला.

Leave a Comment