दुसरी पत्नी होण्याचा नवा ट्रेंड

चित्रपट नायीकामध्ये एकदा विवाह झालेल्या पुरुषसोबत लग्न करण्याचा नवा ट्रेंड आलेला दिसत  आहे. प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरने सैफअली खान सोबत १६ ऑक्टोबर रोजी विवाह करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे.यापूर्वी तिच्या मोठ्या बहिणीने म्हणजेच करिष्मा कपूरने विवाहित असलेल्या संजय कपूर या उद्योगपती  सोबत विवाह  केला आहे. यापूर्वी अनेक नायिकांनी अशाच प्रकारचा विवाह करून वैवाहिक  जीवन जगण्याला पसंती दिली आहे.

 
याची सुरुवात  खऱ्या अर्थाने स्वप्न सुंदरी हेमामालीनी पासून झाली.तिने त्याकाळी  विवाह झालेल्या धर्मेंद्रसोबत तिची पहिली पत्नी प्रकाश  कौर असताना  लग्न  केले. त्यानंतर  श्रीकांत नाहता याचे पहिले लग्न चंद्रा नावाच्या महिलेसोबत झाले असताना अभिनेत्री जयाप्रदा हिने तिच्याशी विवाह केला आहे.  काही दिवसापासून तर हा ट्रेंड झालेला दिसत आहे. अभिनेत्री संगीता बीझलाणीने भारताचा माजी  कर्णधार मोहमद अझहर सोबत विवाह केला. तिच्या पावलावर पाऊल टाकत काही दिवसापूर्वी महेश भूपती सोबत लारा दत्ताने लग्न केले आहे.
तर असाच प्रकारे महिमा चौधरीने बाबू  मुखर्जीसोबत तर नायिका रवीनाने चित्रपट निर्माता अनिल थडानी सोबत तर किरण राव हिने नायक असलेल्या अमीर खान सोबत विवाह केला आहे.आता आगामी काळात या नव्या ट्रेंड नुसार कोण कोण लग्न करतात हे पाहणे औत्साक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment