‘गँग्ज ऑफ वासेपूर’ हा प्रौढांसाठी

`गँग्ज ऑफ वासेपूर’ हा चित्रपट लहान मुलांसाठी नसून तो प्रौढांसाठीच आहे. त्यामुळे त्याला भविष्यात अ प्रमाणपत्र मिळाले तरी फरक पडत नाही, असे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी म्हटले आहे. हा चित्रपट अद्याप सेन्सॉर बोर्डाकडे पाठवलेला नाही; पण हा चित्रपट फक्त प्रौढांसाठीच आहे. त्यामुळे या चित्रपटाला अ प्रमाणपत्रच मिळायला हवे; पण चित्रपटात कुठलाही कट सुचवला जाऊ नये, असे अनुरागने म्हटले आहे. या सिनेमात मनोज बाजपेयी, नवाझुद्दीन सिद्दीकी, रिचा चढ्ढा, हुमा कुरेशी प्रमुख भूमिकेत आहेत. नुकताच कान्स महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आला होता.

Leave a Comment