
पणजी, दि. ५ – मान्सूनचे मंगळवारी केरळमध्ये आगमन झाले असून, पुढील ४८ तासात तो गोव्यात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दक्षिण कर्नाटकातील मंगलोर व जवळपासच्या परिसरावर मान्सूनचे ढग जमा झाले असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
