
लंडन- राष्टप्रेम, प्रखर राष्ट्राभिमान यासाठी ब्रिटीश दीर्घकाळापासून नावाजले जातात. मात्र सध्याच्या जागतिक मंदीच्या फेर्याचा मोठा फटका ब्रिटनवासियांना बसला आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या असून बेरोजगारांची संख्याही वाढत चालली आहे. याचा एक परिणाम असाही होताना दिसतो आहे की ब्रिटनमधील प्रचंड मॉल्स, दुकाने यातून वस्तू पळवून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. दुकाने, मॉल्स, उद्योग व बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणार्या सिटी वॉच कंपनीनेच असा अहवाल सादर केला आहे.
