
इस्लामाबाद दि.४- सोमवारी भल्या पहाटेच पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्थान भागातील मीर अली भागात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात १५ दहशतवादी ठार झाले असल्याचे पाकिस्तानच्या गुप्तवार्ता विभागातील अधिकार्यांनी सांगितले आहे. रविवारीही दक्षिण वझिरास्तान भागात ड्रोन हल्ले करण्यात आले त्यात एका तालिबानी नेत्यासह १० जण ठार झाले आहेत.
