
`बँड बाजा बारात’ चित्रपटामध्ये अनुष्का शर्मासोबत जोडी जमवून बॉलीवूडमध्ये दाखल झालेल्या रणवीर सिंगची जोडी आता करिना कपूरसोबत जमली आहे. संजय भन्सालीने आपल्या आगामी रामलीला या सिनेमात रणवीर आणि करिना यांना एकत्र आणले आहे. मागील बर्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त अखेर गवसला आहे. भन्साली जुलै महिन्यात रामलीलाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. गुजरातमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्याची भन्सालीची योजना आहे.
