
‘इश्क इन पॅरिस’मधून चित्रपट निर्मिती जगतात पाऊल ठेवलेली अभिनेत्री प्रीती झिंटाच्या मते, तिचा हा चित्रपट यावर्षी २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री ते पंजाब किंग इलेव्हन या आयपीएल क्रिकेट संघाच्या मालकिणीची जबाबदारी पार पाडल्यानंतर प्रीती झिंटा आता चक्क निर्मितीच्या क्षेत्राकडे वळली आहे. याअगोदर तिने सलमान खानच्या निर्मितीतला चित्रपट ‘मैं और मिसेस खन्ना’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती.
