
मुंबई – रविवारी झालेल्या आयपीएलच्या पाचव्या हंगामातील अंतिम सामन्यात बाजी मारली ती किग खान शाहरूख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स या संघाने. त्यांच्या या विजयामुळे आयपीएलला एक नवा विजेता मिळाला आहे. रविवारच्या सामन्यात अशक्य वाटणारे लक्ष्यही त्यांनी पूर्ण केले. आणि चेन्नईचे तिसरे अजिक्यपद मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळविले. आयपीएलच्या या सत्रातला ऑरेंज कॅप चा मानकरी ठरला तो वेस्टइंडिजचा ख्रिस गेल. आपल्या तुफानी फलंदाजीचा जोर या हंगामातही कायम ठेवून त्याने सलग दुसर्यांदा ऑरेंज कॅप पटकावली. त्याने या हंगामात १५ सामन्यांमध्ये ७३३ धावा तडकावल्या यामध्ये ५९ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. तर पर्पल कॅप चा मानकरी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा मॉर्ने मॉकर्ल ठरला. आयपीएलचा हा हंगाम सर्वात जास्त लक्षात राहिला तो वादांमुळे प्रथम पाच खळाडुंच्या स्टिंग ऑपरेशनचे भूत आयपीएलवर बसले, त्यानंतर या पाचही खेळाडूनंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, त्याआधी शाहरूख खानने सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढल्याचे प्रकरण हे नुकतेच ताजे होते. त्यानंतर ल्युक पॉमरबॅश या ऑस्टलियन खेळाडूने एका तरूणीशी छेडछाड केल्याचे प्रकरणही खूप गाजले. मुंबई आणि कोलकाता सामन्यानंतर संघाचा मालक शाहरूख खान याने मुंबई क्रेकेट संघटनेच्या पदाधिकार्यांची हुज्जत घातली, त्यामुळे शाहरूख खानवर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आजीवन बंदी घालण्यात आली. आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना फिक्स असल्याचेही बोलले गेले.
