आता वीणा मालिक करणार सिल्क स्मिताची भूमिका

‘डर्टी’ पिक्चरमध्ये सिल्क स्मिताची भूमिका अभिनेत्री विद्या बालनने साकारल्यानंतर आता ती भूमिका करण्यासाठी बॉलीवूडमध्ये सध्या चढाओढ लागलेली आहे. बॉलीवूडनंतर आता कन्नड भाषेत येणार्‍या ‘डर्टी’ पिक्चरमध्ये आता पाकितानातील वादग्रस्त अभिनेत्री वीणा मालिक सिल्क स्मिताची भूमिका करणार आहे.

वीणा मालिक म्हटले की, तिचे सर्व वादग्रस्त प्रकरणे समोर येतात. वीणा प्रकाशझोतात आली ती पाकिस्तानातील क्रिकेटपटू मॅचफिक्सिंग करीत असल्याच्या आरोपावरून. तिच्यामुळे वीणा क्रिकेटपटूंना पाकिस्तान टीममधून वगळण्यात आले होते. त्यानंतर वीणा मालिक ही भारतातील बहुचर्चित बित्र बॉबच्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिने सहकार्र्‍यांसोबत केलेल्या वर्तणामुळे चांगलीच फेमस झाली.

त्यानंतरही वीणा या ना त्या कारणाने सर्वत्र वादातच राहिली. काही दिवसांपूर्वी तिने टॉपलेस फोटो शूट करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. काही दिवसांपूर्वीच तिने बॉलीवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘डर्टी’ पिक्चरला बॉलीवूडमध्ये मिळालेले यश पाहून कन्नड चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक त्रिशुल यांनी दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारीत ‘डर्टी’ पिक्चरची निर्मिती करणार असून त्यासाठी आता त्यांनी विणा मालिकची निवड केली आहे.

सिल्कची भूमिका वीणा करणार असल्याने ती आता कशाप्रकारे हा अभिनय करणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लाभली आहे. यापूर्वी तिने पाकिस्तानातील काही चित्रपटातून अभिनय केला आहे.

Leave a Comment