राज्यात सर्वात महाग पेट्रोल सोलापूरात

सोलापूर, दि. २४ – केंद्र सरकारने पेट्रोलचे दर वाढविल्याची घोषणा केल्यानंतर बुधवारी रात्री सोलापूर शहरातील विविध पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरुन घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती. सोलापूरात पेट्रोल चा दर प्रतिलिटर ७४.५० रुपये इतका होता. आता त्यात ७.५० रुपयांनी वाढ झाल्यान हा दर प्रतिलिटर ८१.८९ रुपये इतका झाला आहे. महाराष्ट्रात सोलापूर शहरात पेट्रोल सर्वात महाग विकले जात आहे. पेट्रोल दरवाढीची घोषणा झाल्यानंतर काही पेट्रोल पंपधारकांनी आपले पेट्रोल पंप बंद ठेवून तात्कालिक नफा कमविण्याचा प्रयत्न केल्याचेही आढळून आले. अशा प्रकारांबद्दल वाहनधारकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment