रणवीर- समिरांची जमली जोडी

बॉलीवूडमध्ये दोन कलाकार एकत्रित आले, की कधी त्यांचे सूर जुळतील सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून समिरा रेड्डी व रणवीर सिंहकडे सध्या फारसे चित्रपट नसल्याने दोघांनाही सध्या जास्तीचे काम नसल्याने वर्क आऊटच्या माध्यमातून दोघेही एकत्रित फिरत आहे.

बॉलीवूडमध्ये काम नसल्याने सध्या समिरा व रणवीरकडे खूपच वेळ शिल्लक आहे. त्यामुळे दोघेही व्यायाम करण्याच्या दृष्टीने स्विमींग क्लब जॉईन केला आहे. स्विमींगच्या निमित्ताने दोघेही सतत एकत्रित फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. एवढेच नव्हे तर दोघेही स्विमींग करतात. एवढेच नव्हे तर स्विमींगच्या दरम्यान रेस लावतात. मात्र या रेसमध्ये कोणीच जिंकत नाही व कोणीही हरत नाही. केवळ स्विमींगचा छंद जोपासण्यासाठी हे दोघेही करीत असतात.

याबाबत समिराकडे विचारणा केली असता तिने दोघात मैत्रीचे संबंध असल्याची कबुली दिली. प्रसार माध्यमांकडून गेल्या काही दिवसांपून आमच्या दोघांत प्रेमसंबंध असण्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र फारसे काही तथ्य नाही. चित्रिकरणाच्या कामातून वेळ मिळाल्यानंतर केवळ छंद जोपासता यावा व फिटनेससाठी स्विमींग उपयुक्त असल्याने दोघांनेही एकत्रित स्विमींग क्लास जॉईन केला आहे.

आगामी काळात लग्नाबाबत आजून काहीही विचार केला नाही. सध्या केवळ बॉलीवूडमध्ये चांगले करिअर घडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लग्नाबाबत काही निर्णय घेतल्यानंतर ते सर्वांना सांगावेच लागणार आहे. प्रसारमाध्यमापुढे काही लपून राहात नाही. त्यामुळे केवळ करिअर बनविण्याच्या उद्देशाने कामावर लक्ष केंद्रित केले असून, त्यावरच बरीचशी मेहनत घेत असल्याची कबुली यावेळी समिराने दिली.