नवी दिल्ली दि.२४- पेट्रोलच्या दरात काल करण्यात आलेल्या साडेसात रूपयांच्या घसघशीत वाढीविरोधात तसेच अन्नधान्य महागाई विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असून त्यांनी ३१ मे रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.

जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव यासंबंधी माहिती देताना म्हणाले की पेट्रोलची दरवाढ हा सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. तरीही सरकारने पेट्रोल कंपन्यांना तोटा होत असल्याचे कारण देऊन दरवाढ केली आहे. अन्नधान्याच्या भावांनी तर केव्हाच अस्मान गाठले आहे. अधिवेशन संपल्याबरोबर सरकारने पेट्रोल दर वाढविले आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर डिझेल आणि एलपीजी दरवाढीचे सूतोवाच अगोदरच केले गेले आहे. त्यामुळेच या दरवाढीविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत आणि आम्ही बंद पुकारला आहे.
सरकारच्या या चुकीच्या धोरणांची झळ सर्वसामान्य जनतेलाच सोसावी लागत आहे. सर्वसामान्यांना या देशात वालीच राहिलेला नाही असेही यादव म्हणाले.