कोलकाता नाईट रायडर्स पहिल्यांदा अंतिम फेरीत

कोलकाता नाईट रायडर्स ने दिल्ली डेअरडेव्हिल्स चा १८ धावांनी पराभव करून आयपील च्या अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे.

कोलकाता नाईट रायडर्स ने प्रथम फलंदाजी करत दिल्ली समोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले.कप्तान गौतम गंभीर ने सुरेख  फटकेबाजी करत १६ चेंडूत ३२ धावा केल्या व त्याने ब्रेंडन मॅकलम सोबत आपल्या संघाला जोरदार सुरवात करून दिली.मात्र गंभीर बाद झाल्यानंतर ब्रेंडन मॅकलम व कॅलिस यांना वेगाने धावा काढता आल्या नाही.१६ षटकात १०६ वर ४ असतांना असे वाटत होते की १४० धावा सुद्धा होणार नाहीत.पण युसुफ पठाण ४०(२१) आणी लक्ष्मिरतन शुक्ला २४(११) यांनी तुफानी फटकेबाजी करत २० षटकात १६३ वर धावसंख्या नेली.

दिल्ली डेअरडेव्हिल्स सुरुवात खराब झाली.पहिल्या १३ चेंडूमध्ये दिल्लीने सेहवाग व वार्नर यांचे बळी गमावले.महेला जयवर्धने ४०(३३) ने नमन ओझा २८(२८) सोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण महेला १५ व्या षटकात बाद झाल्यावर दिल्लीच्या आशा मावळल्या.

कोलकाता नाईट रायडर्स तर्फे सुनील नारेण याने अप्रतिम गोलंदाजी करून २४ धावात २ गडी बाद केले.त्याला बालाजी,कॅलिस व अब्दुल्ला यांची सुरेख  साथ मिळाली.


Leave a Comment