मॅडोनाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणे आवडेल

लॉस एंजेलिस – पॉपस्टार मॅडोना हिला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद मिळाले तर चांगले काम करून दाखवीन असे तिने सांगितले आहे. एक दिवसासाठी तुला राष्ट्राध्यक्षपद मिळाले तर तू काय करशील या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली एक दिवसांत काही करता येणार नाही. त्यामुळे दीर्घ काळासाठी मला राष्ट्राध्यक्ष व्हायला आवडेल. राष्ट्राध्यक्ष झालेच तर प्रथम मी देशाचा संहारक शस्त्रे घेण्यावर होत असलेला खर्च बंद करीन. मोठमोठे संहार करू शकतील अशी शस्त्रे घेऊन पैसा खर्च करण्यापेक्षा तोच पैसा मी शिक्षण आणि कलेसाठी खर्च करणे याला प्राधान्य देईन.