
पुणे दि.२१- समाज कल्याण विभागाची पुण्यातील सर्व कार्यालये आता येरवडा येथील १० एकर जागेत उभारण्यात येत असलेल्या संकुलात हलविण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना एकाच छत्राखाली आवश्यक ते सर्व दाखले जसे मिळू शकणार आहेत, तसेच या विभागाच्या शहरात विविध ठिकाणी असलेल्या कार्यालयांपोटी भरावे लागणारे लाखो रूपयांचे भाडेही वाचणार आहे. या इमारतीत जात पडताळणी, जात प्रमाणपत्र, जिल्हा सामाजिक कल्याण विभाग, समाजकल्याण विभागाचे हॉस्टेल, प्रादेशिक आयुक्त कार्यालय, मागास जात बोर्ड, व कॉम्प्युटर प्रशिक्षण सेंटर अशी अनेक कार्यालये असतील. सामाजिक न्यायभवन असे या इमारतीचे नांव आहे.
