मल्लिकामुळे झाला असता अपघात

    मल्लिका शेरावत म्हटले की, अंगप्रदर्शन आलेच. त्यामुळे तिचे लाखो फॅन्स आहेत. तिने घातलेल्या तंग कपड्यात पाहणे तर तिच्या फॅन्सना अधिकच आवडते. काही दिवसांपूर्वी तिला तंग कपडे घातलेले पाहून रिक्षाचालकाने रिक्षा खांबाला धडकावली असती मात्र दैव बलवत्तर म्हणून रिक्षाचालक व मल्लिका दोघेही या अपघातातून बचावले.
    मल्लिका शेरावत व विवेक ऑबेरॉयच्या ‘किस्मत लव पैसा दिल्ली’ या सिनेमाचे सध्या चित्रीकरण सुरू आहे. या सिनेमाच्या वेळी एका गाण्याचे शूटिंग सुरू होते. यावेळी मल्लिकाला गाण्या दरम्यान एका रिक्षातून थोडासा प्रवास करायचा होता. यासाठी एक रिक्षाचालक हुडकून आणला होता. त्याला संपूर्ण सीन समजावून सांगण्यात आला होता.
    यावेळी शूटिंगला सुरूवात करण्यात आल्यानंतर मल्लिका नेहमीप्रमाणे तंग कपडे घालून रिक्षात बसली. यामुळे मात्र रिक्षाचालकाची तारांबळ झाली. तो आरशातून मल्लिकालाच पाहू लागला. मल्लिकाचे ते तंग कपड्यातील रूप पाहून तो अक्षरश: घायाळच झाला. आजूबाजूंनी त्याला सावध करून शूटिंग चालू झाली आहे रिक्षा चालू करण्यास सांगितल्यानंतर त्याने रिक्षा चालू केली. मात्र त्याची नजर मल्लिकावरून हटत नसल्याने रिक्षा समोरच्या उभ्या केलेल्या खांबाला धडकता धडकता वाचला. हा सर्व प्रकार पाहून चित्रीकरण करणार्‍यांना हसू आवरणे कठीण झाले.
    यावेळी विवेक ऑबेरॉयने यातून मार्ग काढला. तोच या रिक्षाचा चालक झाला व त्याने व्यवस्थित रिक्षा चालवून गाण्याचे शूटिंग पूर्ण केले. नाहीतर रिक्षाचालकामुळे या शूटिंगचा खोळंबाच झाला असता.

Leave a Comment