
यवतमाळ, दि. १७ – महाराष्ट्रातील पाणी समस्या सोडविण्याची मागण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. राष्ट्रीय बंजारा क्रांतीदल अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र प्रदेश संघटक तारासिंग पवार यांनी राज्यातील पाणीप्रश्न या निवेदनातून मांडला आहे.
पाणीसमस्या सोडविण्यासाठी शासनाकडून राबविल्या जाणार्या विविध योजना कुचकामी ठरत आहेत. बहुतांश ठिकाणी टँकरद्वारे आवश्यक तेवढे पाणी पुरविले जात नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरु आहे. ग्रामीण भागात कायमस्वरुपी योजना नाही. पाणी टंचाईच्या काळातच उपाय शोधले जातात. या समस्येवर कायम तोडगा काढण्याची गरज आहे असे या निवेदनात म्हटले आहे.
