बड्या बॅनरचे चित्रपट येणार आयपीएलनंतर

    मार्च महिन्यात परिक्षामुळे तर एप्रिल व मे महिन्यात आयपीएलमुळे मोठ्या बॅनरचे अनेक चित्रपट तयार होवूनही रखडले आहेत. सर्वच जण आयपीएल व मे महिना संपण्याची वाट पाहत आहेत. आयपीएलमुळे खर्‍या अर्थाने सिनेमा चाहत्याची निराशा झाली आहे. सुट्टी असूनही आयपीएल मुळे चित्रपट पाहण्याची संधी न मिळाल्यामुळे सिनेरसिकांची घोर निराशा झाली आहे.
    सध्या आयपीएल स्पर्धा शेवटच्या टप्प्यात असल्याने बड्या बॅनरचे अनेक चित्रपट जुन महिन्याच्या सुरूवातीला प्रदर्शित होणार आहेत. अक्षयकुमार व सोनाक्षी सिन्हाचा ‘रावडी राठोड’ ने बॉक्स ऑफिस पुन्हा जोमाने सुरू होणार आहे. एप्रिल महिन्यात ‘हाऊसफुल – २’  आणि ‘विकी डोनर’ हे दोन चित्रपट सोडले, तर इतर मोठे चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. त्यामुळे मोठ्या बॅनरचे अनेक चित्रपट जुन महिन्यातील चांगल्या तारखांची वाट पाहत आहेत. अभय देओल आणि इमरान हाश्मी या दोघांची जोडी ‘शांघाय’ या चित्रपटातून प्रेक्षंकासमोर येत आहे. त्यासोबतच विधू विनोद चोप्राचा ‘फेरारी की सवारी’ मधुन वेगळा विषयाचा चित्रपट येत आहे. त्यानंतर कुणाल कोहलीचा ‘तेरी मेरी कहानी’ हा चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज आहे. शहिद व प्रियांकाची जोडी. पुन्हा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मनोज वाजपेयी आणि शबाना आझमी यांचा प्रमुख भूमिका असलेला ‘गँग्ज ऑफ वतेफूर’ मधुन पुन्हा एकदा चौकटी बाहेरचा चित्रपट येत आहे. जूलै महिन्यातही बॉक्स ऑफिसवर अजय देवगण व अभिषेक बच्चनचा ‘बोलबच्चन’ येत आहे. रणबीर-प्रियांका-इलिल्ना हे त्रिकूट असलेला ‘बर्फी’ हा चित्रपट येत आहे. त्यासोबतच ‘कॉकटेल’, ‘ऑर्ट’, ‘मी और मै’ हे चित्रपट येणार असल्याने आगामी जून व जूलै महिने चित्रपट रसिकासाठी खर्‍या अर्थाने पर्वणी ठरणार आहे.
  

Leave a Comment