कतरिना फार्मात

मुंबई दि.१५- कतरिना कैफ सध्या भलतीच फार्मात असून ती एकाचवेळी बॉलिवूडच्या तिन्ही खानांबरोबर चित्रपट करत आहे. सलमान, आमीर आणि शाहरूख बरोबर ती तीन वेगवेगळे चित्रपट करत आहे मात्र यापैकी कोणता खान अधिक आवडतो या प्रश्नाचे उत्तर मात्र तिने सोयीस्कररित्या टाळले आहे.
 कतरिना म्हणते मला असा प्रश्न विचारणे मुळातच चूक आहे. या तिघांपैकी कोणीही अगर तीन वेगवेगळ्या अभिनेत्रींबरोबर काम करत असते, तर त्यांनाही असा प्रश्न विचारलेला मला आवडले नसते. आमीर, सलमान आणि शाहरूख वेगळेच आहेत. तिघेही आयकॉन आहेत व लिजंड आहेत. माझे भाग्य मोठे की मी तिघांबरोबरही काम करते आहे.
  ती पुढे असेही म्हणते की, मला जर संधी मिळाली तर कुठल्याच अभिनेत्रीला मी या तिघांबरोबर काम करू देणार नाही. पण मला माहिती आहे की असे होऊ शकत नाही. कतरिना सध्या तिच्या करियरच्या पीकवर आहे. सलमानबरोबर एक था टायगर ती करते आहे. शाहरूख बरोबरच्या सिनेमाचे नांव अद्यापी ठरलेले नाही तर आमीर बरोबर ती धूम ३ मध्ये चमकणार आहे.

Leave a Comment