सलमानसोबत प्रेमसंबंध नाहीत – कॅटरिना

    सलमान खान आणि कॅटरिना कैफ म्हटले की, अनेकांना त्यांच्या प्रेमसंबंधाच्या रसभरीत चर्चा ऐकण्यास बरे वाटते. त्यांच्या या संबंधावर बरेच चित्रपट आले व गाजले देखील. याबाबत कित्येकदा प्रसारमाध्यमांनी विविध गॉसिप्स प्रसिद्ध करून पब्लिसिटी मिळविली. मात्र, या संबंधात कॅटरिनाने कधीच ‘भ‘’ शब्दही काढला नव्हता त्यामुळे दोघांच्या फॅन्सना याबाबत सदैव उत्सुकता वाटत होती. मात्र ह्या उत्सुकतेचा बार कॅटरिनाने फोडला आहे.
    सलमान खान जरी काहीही म्हणत असेल, तर माझे त्याच्यासोबत प्रेमसंबंध नाहीत. मी त्याच्यावर कधीच प्रेम केलेले नाही. त्यामुळे लग्नाचा तर प्रश्‍नच येत नसल्याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीतून केला आहे. सध्या सलमान व कॅटरिना हे दोघेही ‘टायगर’ चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या निमित्ताने एकत्रित आले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्या सर्व अफवांचे कॅटरिनाने यावेळी खंडन केले. या संबंधाबाबत प्रथमच कॅटरिना इतके खोलून बोलल्याने मिडीयात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
    सलमानच्या आईने काही दिवसांपूर्वीच स्कॉटलंडची मॉडेल पसंत केली आहे. तिच्या सोबत सलमानने विवाह करावा अशी गळ घातली जात आहे. सलमान जरी वरवर बोलत असला तरी त्याचीच कॅटरिना सोबत विवाह करण्याची इच्छा नसल्याने घरच्या मंडळींनी वधु संशोधन मोहीम हाती घेतली असल्याचे समजते. आगामी काळात जर सलमानने त्या ‘मॉडेल’ला होकार दर्शविला तर लवकरच तो बोहल्यावर चढलेला सर्वांना पहायला मिळेल. एक मात्र नक्की की आता सलमान आणि कॅटरिनाचा विवाह मात्र होणार नाही.

Leave a Comment